निर्बंध हटले; दाेन वर्ष मूर्तिकामात गुंतलेले सहा काेटी माेकळे झाले!

अकोला


साहित्याचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढले. त्यामुळे िनर्णयामुळे गुंतलेले पैसे परत मिळणार एवढाच काय ताे फायदा, असे मत विविध मूर्तिकारांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.
..तर फायदा झाला असता ः माेठ्या अाकारातील गणेश मूर्ती तयार करण्यासाठी उत्सवापूर्वी ५ ते ६ महिन्यांपासूनच तयारी करावी लागते. िवत्तीय संस्था कर्जासाठी प्रचंड कागदपत्रे मागतात. त्यामुळे खासगीतून पैशांची जुळवाजुळव करावी लागते. सन २०२० मध्येही अाम्ही अशीच तयारी केली. मात्र मार्चमध्ये काेराेनाचा संसर्ग सुरू झाला अन् सर्वच ठप्प झाले. अशातच मूर्तीच्या उंचीवर मर्यादा असल्याने बजेटच काेलमडले. यंदा मात्र मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध काही िदवसांपूर्वी हटल्याने रात्रंदिवस काम करून मूर्ती तयार केल्या. मात्र हाच िनर्णय पूर्वीच झाला असता तर अाणखी फायदा झाला असता, असेही िनरीक्षण मूर्तिकारांनी नाेंदवले. निर्बंध हटवल्याने आता कर्जमुक्तीची घटिका समीप आल्याचा आनंद काही मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर होता.
मराठवाडा, खांदेशातही मागणी ः मोठ्या आकारातील गणेशमूर्ती बनवणाऱ्या अकाेल्यातील मूर्तिकारांनी खांदेश व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अापली कला पाेहाेचवली अाहे. अकाेल्यातील मूर्तींना जळगाव, िहंगाेली, नांदेड, वाशीम, अमरावती िजल्ह्यातील अचलपूर, परतवाडासह अकाेला जिल्ह्यातून मागणी असते.
सुवर्णमध्य काेण काढणार? ः िजल्ह्यात २०२२ वर्षाकरीता गणेशाेत्सवा दरम्‍यान प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मूर्ती निर्मिती व विक्री करण्‍यास अटी-शर्तीसह जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात अाली अाहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे २० मेच्या अधिसूचनेनुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्‍यासाठी प्‍लॉस्‍टर ऑफ पॅरिसच्या वापरास प्रतिबंध करण्यात आले होते. मात्र पर्यावरण समितीच्या बैठकीनंतर ही परवानगी देण्यात अाली. पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायु प्रदूषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या हाेत्या. त्यामुळे पीअाेपीबाबत स्पष्ट व वेळीच धाेरण अाखावे, मूर्तींचे िवसर्जन शास्त्रीय पद्धतीने हाेऊन प्रदूषण टळावे, उत्सव उत्साहात व पर्यावरण पूरक व्हावा, काेणत्याही घटकाचे अार्थिक नुकसान हाेणार नाही, काेणीही बेराेजगार हाेणार नाही, याअनुषंगाने सुवर्णमध्य निघण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *