सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत. असे असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही थेट ऑस्ट्रेलियातून भारतीयांना गणेत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वत:चा गणपती बाप्पासोबतचा खास फोटो ट्वीट केलाय. या फोटोची तसेच वॉर्नरने दिलेल्या या शुभेच्छांची सगळीकडे चर्चा होत आहे.गणेश चतुर्थीनिमित्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना तो बाप्पासमोर नतमस्तक झाला आहे. बाप्पाला होत जोडतानाचा फोटो त्याने शोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच “भारतातील माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे आयुष्य आनंदमय होवे,” अशा सदिच्छादेखील त्याने दिल्या आहेत. त्याच्या या खास शुभेच्छा भारतीयांना चांगल्याच आवडल्या आसून भारतीय क्रिकेटप्रेमी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.