शेतकऱ्यांप्रमाणे आता आयटी क्षेत्रालाही पावसाचा तडाखा… बंगळुरु आयटी सेक्टरचे एवढया कोटींचे नुकसान..

देश – विदेश

गेल्या काही दिवासांपासून बंगळुरुत पावसाने थैमान घातलं आहे. मुसधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या पावसाचा सगळ्यात मोठा फटका बंगरुळुतील आयटी कंपन्यांना बसला आहे. एका दिवसात आयटी कंपन्यांच तब्बल २२५ कोटी रुपयांच नुकसान झालं आहे. द आऊटर रिंग रोड कंपनीज असोसिएशनने (ORRCA) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना याबाबत एक पत्र लिहीले आहे.मुसळधार पावासमुळे बंगरुळुतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. परिणामी वाहतुकींची कोंडी होऊन कर्मचारी वेळेत कामावर पोहोचू शकले नाही. त्यामुळे एका दिवसात आयटी कंपन्यांना २२५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाण्यामुळे इतर वाहने त्या भागात जाऊ शकत नसल्यामुळे ट्रॅक्टर आणि नावेच्या मदतीने आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना ऑफिस गाठावे लागत आहे. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ORRCA हे आऊटर रिंग रोड (ORR) मार्गावरील सर्व प्रमुख आयटी आणि बँकिंग कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारे आयटी फर्म आहे. जवळपास पाच लाखांच्या घरात कर्मचारी या फर्ममध्ये काम करतात. ORRCA ने वर्तवलेल्या अंदाजानुसार सेंट्रल सिल्क बोर्ड आणि के.आर.पुरम कॉरिडॉर भागात आऊटर रिंग रोडला पाच लाखांहून जास्त व्यवसायिक कार्यरत आहेत. १७ किमीच्या या भव्य परिसरात १ मिलियनपेक्षा जास्त लोकांचा उदरनिर्वाह चालतो.ORR IT दरवर्षीचा रिवेन्यू $२२ अब्ज एवढा असतो. हा आकडा संपूर्ण बंगळुरू रिवेन्यूच्या ३२ टक्के आहे. या फर्मचं टॅक्स भरण्यात मोठं योगदान आहे. तेव्हा विकासाच्या दृष्टीने या भागातील इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *