अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये जेष्ठ नागरिकांसोबतच इतर सवलती करिता प्रवाशांना स्मार्ट कार्ड बाळगणे येत्या 31 ऑक्टोबर पासून बंधनकारक
करण्यात आले तथापि गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून ठप्प झालेली स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरळीत न झाल्याने दररोज मोठ्या संख्येत जेष्ठ नागरिक मध्यवर्ती बसस्थानकावरील नोंदणी कक्षा पर्यंत येऊन बरेच वेळ त्या ठिकाणी प्रतीक्षा करून वापस जाताना दिसत आहे.गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरूना प्रादुर्भावाची स्थिती व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या दोन कारणांमुळे आगर व विभागीय कार्यालयामध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही त्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली आहे परंतु हजारो सवलत धारकांनी नव्या स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केलेली नाही तसेच नोंदणी केलेल्या अनेकांना स्मार्ट कार्ड वितरित झाले नाही परिणाम ही सवलत धारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे मुदतवाढ मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्याचा फलकच मध्यवर्ती बसस्थानकावर लावण्यात आला आहे जिल्ह्यातील इतर आगर मध्ये ही नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसस्थानकावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत संबंधिताने योग्य ते पाऊल उचलून निर्णय घ्यावा आणि जेष्ठ नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी होत असल्याचे दिसते.