“संपूर्ण ब्रिटिश म्युझियमच…”; रविना टंडनने घेतली कोहिनूर हिऱ्याच्या वादात उडी

Entertainment


अलीकडेच ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. जगभरातून त्यांच्या निधनाबद्दल लोक शोक व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यामध्ये कोहिनूर सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. कोहिनूर हिरा परत मिळावा अशी मागणी करत लोक आपले विचार मांडत आहेत. इंटरनेटवर सुरू असलेल्या या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही उडी घेतली असून तिने या संपूर्ण प्रकरणावर आपले मत मांडले आहे. रवीना टंडनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ब्रिटिश – अमेरिकन कॉमेडियन जॉन ऑलिव्हर यांचा कोहिनूर हिऱ्यावर आधारित असलेला एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोहिनूरच्या ट्रेंडला आणखी वाव मिळाला. रवीनाने शेअर केलेल्या या व्हीडिओत जॉन म्हणतो की, “कोहिनूर हिरा त्यांना परत करावा अशी भारतीयांची मागणी आहे, कोहिनूर भारतातून आणण्यात आला होता, जो आता राणीच्या मुकुटाची शोभा वाढवत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *