मानवीय आहार- शाकाहार’ या पुस्तकाचे लोकार्पण-

अकोला


शिरपूर (जिल्हा- वाशिम)- स्थानिक पवळी जैन मंदिर येथे संत शिरोमणी प्राचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने सांगली येथील साहित्यीक श्री सचिन कुसनाळे यांच्या ‘मानवीय आहार-शाकाहार’ या पुस्तकाचे लोकार्पण पर्युषण महापर्वामध्ये नुकतेच संपन्न झाले.
सदर लोकार्पण सोहळ्यास प्राचार्य प्रशांत गडेकर, निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनीष सेठी, पूज्य तात्या भैय्याजी, संदीप देशमुख,निशा सेठी, मनिषा माणकापूरे, डॉ.स्मिता कुसनाळे तसेच खंडेलवाल महिला मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आहार हेच मुख्यतः औषधाचे कार्य कसे करते,आहारातील उचित फेरबदल आपल्यास कसे स्वास्थ्यकारक ठरतात यासंबंधी मार्गदर्शन डॉ. मनीष सेठी यांनी यावेळी केले.शाकाहाराचा मानवतावादाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध, शाकाहारातील खासकरून फलाहाराविषयी कोरोना काळातील रूग्णांचे स्वानुभव,आपल्या आहाराची ज्ञानपूर्वक व सुपरिणाम पाहून निवड करण्याची गरज,पर्यावरण पूरक शाकाहार,माणसाचा प्राकृतिक आहार शाकाहार यांविषयी प्रा.प्रशांत गडेकर,लेखक सचिन कुसनाळे व अन्य मान्यवरांनी चर्चा केली.
साहित्यिक सचिन कुसनाळे यांनी यापूर्वी ‘जगा आणि जगू द्या’,’स्वातंत्र्यायण’,’विश्ववाद’,’असामान्यत्वचा सिद्धांत’ यांसह अनेक वैचारिक ग्रंथांचे लेखन केले आहे. त्याबद्दल त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कार मिळाले असून त्यांना अनेक संस्थांनी आदर्श शिक्षक म्हणूनही गौरवान्वीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *