वाडेगावच्या मुख्य रस्त्यावर पाण्याच्या डबक्यांमुळे  रास्तारोको

Uncategorized

– रोजच्या अपघात मुळे ग्रामस्थ त्रस्त

 – संबंधीत विभागाचे दुर्लक्ष, ग्राम पंचायत ने घेतला पुढाकार

वाडेगाव:- बाळापूर पातूर रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक जवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पण्यामुळे डबके थांबले होते.या पाण्यामुळे त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.परिणामी यामुळे १८ सप्टेंबर रविवार रोजी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत दुपारी १२ च्या सुमारास काही ग्रामस्थांनी रास्ता रोको करून तो रस्ता दुरुस्ती साठी मागणी केली.
     या रस्ता रोको मूळे  काही तास वाहतूक खोळंबली होती तर ग्रामस्थांनी वाहनचालकांनी हा रस्ता सुरळीत केल्याशिवाय आम्ही मागे होणार नाही असे पोलीसना व  उपस्थित प्रशासनाला बोलत होते.त्यामुळे प्रशासनाने समजूत काढून तुंबलेल्या पाण्याची वहिवाट काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नाली काढल्या आहेत.तसेच या नाल्या सुरळीत न झाल्यास हा रस्ता रोको पुन्हा करण्यात येईल असे ग्रामस्थ बोलत होते.या साचलेल्या पाण्याची व्हिलेवाट करण्यासाठी  पंचायत समिती सदस्य रुपाली अनंता काळे यांनी संबधित प्रशासनाला रस्तावरील पाण्याची वाट काढण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती.ग्रामपंचायत कार्यालय वाडेगाव परिक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग एन एच १६१ चे रुंदीकरण व ब्लक्तिकरणाचे काम मागील वर्षी पूर्णत्वास नेले असून याकडे संबधित विभागाचे देखरेख कडे दुर्लक्ष झाले आहे.या बसस्थानक परिसरात अनेक ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता पाण्याने व्यापला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाचालक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच या पाण्यातून जाताना कोणाचा अपघात होऊ नये म्हणून चक्क खुर्चीला झेंडे बांधून खुर्ची मध्यभागीं रस्त्यावर ठेवण्यात आली होती. याकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले जात असून संबधित विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.तसेच ग्रामपंचायत ने जेसीबी लावून रस्त्याच्या बाजूला नाली काढण्यात आल्याचे सरपंच मंगेश तायडे यांनी सांगितले आहे. यावेळी सचिव सुनील इंगळ, ठाणेदार अव्हाळे साहेब, पि एस आय राहाटे साहेब उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *