– पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, दुसऱ्यांदा केली होती पेरणी
मुर्तीजापुर : सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसान दिवस वाढत चाललेली आहे, नैसर्गिक आपत्तीचा सामना करता मुर्तीजापुर तालुक्याचे शेतकरी पुन्हा संकटात आला आहे, मुर्तीजापुर तालुक्यात मागील पाच दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी काठावर असलेले शेतातील मुंडे तूर सोयाबीन व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसान दिवस वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जर शासनाने त्वरित उपाययोजना केले नाही तर तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्याचा प्रमाण वाढू शकते अशा परिस्थितीत शासनाने त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा साथ द्यावा जेणेकरून शेतकऱ्याचे मनोबल टिकून राहणार आहे नाहीतर परिणाम समोरील सतत पावसामुळे पीक पाण्याखाली गेले आहे तर काही पीक खरडून गेले आहे
मुर्तीजापुर तालुका ओला दुष्काळ शिवाय पर्याय नाही
मुर्तीजापुर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावे त्याशिवाय कोणताही पर्याय नाही आहे म्हणून शासनाने काळजीपूर्व नैसर्गिक आपत्ती संकट मुळे दुसऱ्यांदा पेरणी शेतकऱ्यांनी केली होती परंतु सुरू असलेल्या सतत पावसामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना सुद्धा निसर्गाने साथ दिली नाही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे नदी काठावर असलेल्या भागातील हजार शेतीचे नुकसान होत आहे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करावी
– अप्पु तिडके
माजी जिल्हा परिषद सदस्य फोटो