शरद पवार सोडल्यास राष्ट्रवादी…; भाजपा, PM मोदींवर केलेल्या टीकेवरुन बावनकुळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. रविवारी तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रवादीच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर करण्यात आलेल्या टीकेवरुन बावनकुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख ‘टोळी’ असा केला आहे. मात्र त्याचवेळी बावनकुळे यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला आहे.धुळ्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना बावनकुळे […]

Continue Reading

अनिल परबांच्या रिसॉर्टवर लवकरच पडणार हातोडा

शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर लवकरच कारवाई होणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहेत. पर्यावरण विभागाकडून बांधकामातील अनियमितते प्रकरणी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या २२ सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांनी अर्ज करण्याचं आवाहन या निविदेद्वारे करण्यात आलं आहे.आज सोमवारी […]

Continue Reading

पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाला ऑनलाइन गंडा

नोकरीच्या आमिषाने चोरट्याने तरुणाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने तरुणाच्या बँक खात्यातून एक लाख २३ हजारांची रोकड लांबविली. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण नोकरीच्या शोधात होता. त्याच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने नोकरीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. त्यानंतर चोरट्याने त्याला पुन्हा संदेश पाठविला. चोरट्याने दाखविलेल्या आमिषाला तरुण […]

Continue Reading

“फेविकॉलने नितीश कुमार यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर केले पाहिजे, कारण…”, प्रशांत किशोर यांचा खोचक टोला!

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महागठबंधन सरकारवरुन मिश्किल टोला लगावला आहे. “आम्ही बिहारमध्ये अनेक युती बनताना आणि तुटताना पाहिल्या आहेत. मात्र, यातील एक युती कधीही तुटली नाही. कुठल्याही युती सरकारमध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणि नितीश कुमार ही युती कायम राहिली. ही किमया फक्त तेच साधू शकतात. यासाठी फेविकॉलने त्यांना ब्रँड […]

Continue Reading

“..तर खरी शिवसेना काय आहे, हे त्यांना कळेल”, प्रभादेवी प्रकरणावरून अरविंद सावंतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चर्चा सुरू आहे ती शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याची. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. मात्र, दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदेंनी केला. त्यामुळे सरवणकर […]

Continue Reading

“चीनची चमचेगिरी करणाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या”, राहुल गांधींच्या टी शर्टवरुन नाना पटोलेंचा खोचक सवाल

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टच्या किमतीवरुन भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेवर पलटवार करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. “चीनची चमचेगिरी करणारे जे लोक देशात सत्तेत बसले आहेत, त्यांना राहुल गांधींच्या टी शर्टवरुन मिरची का झोंबली?” असा खोचक सवाल पटोले यांनी केला […]

Continue Reading

पंतप्रधान मोदी देतायत BA ची परीक्षा? बिहारच्या विद्यापीठाने जारी केले हॉलतिकिट, पाहा फोटो

PM Modi Photo on Hall Ticket: बिहारमधील दरभंगा येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठातील वार्षिक परीक्षेच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान, काँग्रेस नेते राहुल गांधी, क्रिकेट स्टार महेंद्रसिंग धोनी यांचे फोटो असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपण पाहू शकता की प्रवेशपत्रिकांवर वेगळ्या तपशीलांसह राजकीय नेते व सेलिब्रिटींचे फोटो दिसत आहेत. […]

Continue Reading

सापाला घाबरतात बिग बी; एका चित्रपटाच्या शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाले, “दिग्दर्शकाने रबराचा साप असल्याचं…”

महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १४’ मुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये हॉटसीटवर येणाऱ्या स्पर्धकांशी बिग बी गप्पा मारतात. स्पर्धकांशी बोलताना ते बऱ्याचदा त्यांचे अनुभव किंवा त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी देखील शेअर करतात. अशातच कोणत्या प्राण्याची भीती वाटते, याबद्दल अमिताभ यांनी या शोमध्ये खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी एक जुना […]

Continue Reading

“३०६ खासदार असूनही मोदी तक्रार करतात की…”, असदुद्दीन ओवेसींचा खोचक टोला; नितीश कुमारांनाही केलं लक्ष्य!

एकीकडे राज्यात शिवसेनेतील बंडखोरी, शिंदेंच सरकार आणि शिंदेगट-शिवसेना यांच्यातील वितुष्ट या घडामोडी घडत असताना दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या आघाडीचा चेहरा म्हणून कधी ममता बॅनर्जींचं नाव घेतलं जातं, कधी शरद पवार तर कधी नितीश कुमार. बिहारमध्ये दोनच दिवसांत सत्ताबदल करून राजदच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमार […]

Continue Reading

“…अन् पोलीस अधिकारीही भयभयीत झाले

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला आहे. हा गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस […]

Continue Reading