हवामान अंदाजःविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

अकोला, दि.11- भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 76 ते 100 मि.मी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुरापासूण बचावासाठी नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी. या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे […]

Continue Reading

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आढावा सभा

अकोला,दि. ११- जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीशी निगडीत विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी  प्रत्येक सोमवारी आढावा घेणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी कृषी संबंधित समस्या मांडण्याकरीता  सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात कृषी संबधीत समस्याबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी कृषी उपसंचालक संध्या करवा, जिल्हा […]

Continue Reading

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष लेख

परिपूर्ण आणि सन्मानजनक जीवनाच्या दिशेने… जगाच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, प्रजनन दरातील बदल, शहरीकरण आणि स्थलांतर याचा दूरगामी परिणाम पुढील पिढ्यांवर होणार आहे. साधनस्रोत, पर्यावरण, सामाजिक वातावरण या बाबीदेखील लोकसंख्येमुळे प्रभावित होत असल्याने त्यादृष्टीने लोकसंख्येचा विचार करणे आवश्यक आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून लोकसंख्या वेगाने वाढण्यास सुरूवात झाली. १९५० ते २०२० दरम्यान जगाची लोकसंख्या तिपटीने वाढली. […]

Continue Reading

पवारांचा मोठा निर्णय, निवडणुकीत २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

मुंबई : राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अडचणीत सापडल्या आहेत. १८ ऑगस्टला मतदान होणार असून १९ ऑगस्टला निकाल लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते, मात्र आता ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बॅकफूटवर आहे. त्यामुळे वेळेवर निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. अशातच […]

Continue Reading

‘मी पुन्हा येईन’चा टीझर पाहून नेटकऱ्यांना आली, सध्याच्या राजकीय घडामोडींची आठवण

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेन्स चित्रपटांपेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज येणार आहे.टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत […]

Continue Reading

आईच्या दुधाशी बेईमानी करु नका – उद्धव ठाकरें

महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद अगदी न्यायलयापासून विधानसभेपर्यंत सर्वच ठिकाणी सुरु आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील खटला ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूने झाडल्या जात असतानाच ४० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची […]

Continue Reading

प्रशासनाच्या नियोजन अभावी दोन गावाचा तुटला संपर्क

हातरून  : नियोजन शून्य शासन आणि प्रशासन असल्यामुळे आज ग्रामीण भागात आज विविध समस्या तोंड वर करतांना दिसत आहे. पावसाआधी करावयाचे काम प्रशासनाद्वारे पूर्ण न होऊ शकल्याने आज बाळापूर तालुक्यातील उरळ खुर्द झुरळ खुर्द या गावावर मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र शासनआजही हातावर हात ठेऊन शांत बसले असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने […]

Continue Reading

हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाविषयी काहीही प्रेम नाही – सुप्रिया सुळेंची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. “हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाविषयी या सरकाराल काहीही प्रेम नाही.” असं त्या म्हणाल्या. माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार सुळे यांनी सांगितले की, “मी […]

Continue Reading

टायगर श्रॉफच्या आजोबांचा दुसऱ्या महायुद्धात होता सहभाग!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेस. टायगर हा लोकप्रिय अॅक्शन हिरोपैकी एक आहे. २०१४ मध्ये हिरोपंती या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तुम्हाला माहितीये या अॅक्शन हीरोचे आजोबा हे रियल लाइफ हीरो होते.टायगर श्रॉफची आई आयशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो टायगरचे आजोबा म्हणजेच आयशा […]

Continue Reading