केआरकेचे ‘ते’ ट्वीट चर्चेत!

“बिग बी आणि शाहरुख सोडून सर्व दहावी नापास”, नुकतंच केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्यांवर टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तो अनेकदा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. विशेष म्हणजे तो त्याच्या ट्वीटद्वारे कोणत्या ना कोणत्या […]

Continue Reading

मध्य प्रदेशात ‘आप’ला महापौरपद

मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने एक महापौरपद जिंकले आहे.भोपाळ : मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने एक महापौरपद जिंकले आहे. राज्यातील ११ पैकी सहा ठिकाणी भाजपने महापौरपद जिंकले आहे. तर काँग्रेसला तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. सिंगरौली येथील महापौरपदी आम आदमी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. भाजपला इंदूर, […]

Continue Reading

राज्यात दीड वर्षांत २२ हजार ७५१ बालमृत्यू

बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारकडून योजना राबवण्यात येत असल्या, तरी बालकांचे मृत्यूंचे प्रमाण वाढले असून गेल्या सतरा महिन्यांमध्ये राज्यात २२ हजार ७५१ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. अमरावती : बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारकडून योजना राबवण्यात येत असल्या, तरी बालकांचे मृत्यूंचे प्रमाण वाढले असून गेल्या सतरा महिन्यांमध्ये राज्यात २२ हजार ७५१ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. कुपोषण आणि महिला आरोग्याच्या प्रश्नांवर […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, सोमवार १८ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींनी सकारात्मकता कमी पडू देऊ नका. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मेष:- भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. वृषभ:- कलहकारक वातावरण टाळावे. गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण […]

Continue Reading

“एका मोदीला मिस इंडिया हवी, दुसऱ्याला…” उद्योगपती हर्ष गोएंका यांचं भन्नाट ट्वीट व्हायरल!

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून देशाबाहेर असणारे आणि आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असणारे ललित मोदी आणि सुष्मिता सेन रिलेशनमध्ये असल्याचा मुद्दा सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी […]

Continue Reading

शिवसेना बंडखोरीबाबतच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ‘या’ दिवशी होणार सुनावणी

शिवसेनेतील बंडखोरीचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत मोठा निर्णय झाला आहे. शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरिक्षणं नोंदवतं आणि काय निकाल देतं याकडे राज्यातील सर्वांचंच लक्ष असणार आहे.या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय […]

Continue Reading

सावधान, तुम्ही खात असलेला तो समोसा शिळा

अमराठी व्यावसायिकाचे हजारो ग्राहकांच्या जीवाशी खेळ – ग्राहकाचा दावाउघड्या नालीवर खाद्यप्रेमींना आजाराचे गिफ्ट,एम आय डी सी पॅâक्टरीतील गोरखधंदाशिंदे सरकार एफडीए च्या भ्रष्ट अधिकाNयांवर कारवाई करा अकोला,१६ जुलैअमराठी व्यावसायिकाकडून तुम्ही मोठ्या आवडीने विकत घेत असलेले आणि चवीने पोटात टाकणारे शिळे समोसे खात आहात. एमआयडीसी पॅâक्टरीत हे समोसे डिप प्रिâजमध्ये एक ते दोन दिवस ठेवल्यानंतर तुम्ही नाली […]

Continue Reading

राज्यात गेल्या पंधरा दिवसात पावसाचे १०२ बळी, अनेक बेपत्ता!

मुंबई : राज्यात यंदा मॉन्सूननं दमदार हजेरी लावली असून सर्वदूर चांगला पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांना मोठ्या नुकसानीलाही समोरं जावं लागलं आहे. यामध्ये गेल्या पंधरा दिवसात सुमारे १०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती दिली.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जुलैपासून आत्तापर्यंत पावसामुळं अनेकांना आपला […]

Continue Reading

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २४ विधेयके मांडण्यात येणार

दिल्ली,सोमवारपासून सुरू होणाNया संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी केंद्राने कॅन्टोन्मेंट विधेयक, बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक आणि दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयकासह २४ विधेयके सूचीबद्ध केली आहेत.लोकसभेच्या सचिवालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, कॅन्टोन्मेंट विधेयक देशभरातील नगरपालिकांसोबत संरेखित करून अधिक विकासात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि कॅन्टोन्मेंटमध्ये ‘जीवन सुलभता’ सुलभ करण्यासाठी प्रस्तावित आहे.बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक हे […]

Continue Reading

स्टोव्हसाठी रॉकेल बरोबर डिझेलचा वापर

मुंबई,रॉकेल सुमारे १०० रुपयांपर्यंत पोचल्याने चूल अथवा स्टोव्ह पेटवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचा दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यापाठोपाठ रॉकेलच्या किमती वाढल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, जिथे रॉकेल मिळत नाही तिथे थेट डिझेल चा वापर होत असल्याची माहिती समोर आली […]

Continue Reading