भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती

अकोला: शहराच्या कानाकोपऱ्यात भटक्या श्वानांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना सातत्याने घडून येत आहेत. या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने यापूर्वी नसबंदीसाठी केलेला कंत्राट रद्द करीत नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. आजवर शहरातील १० हजार २७२ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी कुत्र्यांचा उच्छाद लक्षात घेता यापूर्वी करण्यात आलेला […]

Continue Reading

पालेभाज्यांचे दर भिडले गगनाला

अकोला : येथील ठोक भाजी बाजारात बाहेरून येणाऱ्या मालाची आवक मोठी आहे. मात्र, भाज्यांची आवक कमी झाली. बाजारात नियमित येणाऱ्या मालाच्या तुलनेत निम्माच माल उतरवला जात आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना भाज्यांचा तुटवडा जाणवतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. स्थानिक भागातूनही शहरात शेतकरी माल पोहोचवतात. पण सध्या त्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे भाज्यांच्या किंमतीत वाढ […]

Continue Reading

दसरा मेळावा  :  बीकेसी मैदान शिंदे गटाला; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

मुंबई  : दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएने दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला अर्ज एमएमआरडीएने फेटाळला आहे.  दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठीचा करण्यात आलेला […]

Continue Reading

घर सांभाळत महिलांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद

अध्यक्षा लि.प्रतिभाजी कावेकर यांनी केले कौतुकलिनेस क्लबची मासिक सभा उत्साहात संपन्न अकोला :  घर सांभाळून आणि कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी सांभाळात सामाजिक कार्य करणाNया महिलांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार लिनेस क्लबच्या लातूर येथील प्रांताध्यक्ष लि.प्रतिभाजी कावेकर यांनी अकोल्यात काढले. त्यांनी अकोल्यात आयोजित लिनेस क्लबच्या मासिक सभेत उपस्थित लिनेस क्लबच्या सर्व महिला सदस्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची व […]

Continue Reading

सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाई तत्पर

– त्र्यंबक सिरसाट बाळापूर येथील रिपाई ( आठवले ) पक्षाची आढावा सभा संपन्न बाळापूर : ना. रामदास आठवले केंद्रीय मंत्री, नवी दिल्ली यांच्या  नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची घोडदौड सुरू असुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन रिपाई पक्षाच्या बाळापूर येथील आढावा सभेत अध्यक्षपदावरून बोलताना अकोला जिल्हाध्यक्ष त्र्यंबक सिरसाट यांनी केले. […]

Continue Reading

समाजात आई-वडिलांचे ऋण अनंत- संग्राम गावंडे

– लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊनने मातोश्री वृद्धाश्रमात केली भोजन व्यवस्थाअकोला- वृद्धाश्रम ही संकल्पना भारतीय संस्कृतीत नाही. मात्र आधुनिक व पाश्चात्य परंपरेच्या नांदी  लागून युवा पिढी वृद्ध आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करीत आहे. अगदी शासकीय नोकरी करणारी युवा पिढी ही या दृष्ट चक्राच्या नादी लागली आहे. वास्तविक माता-पित्यांचे उपकार हे अनंत आहेत ते न फिटणारे आहेत. […]

Continue Reading

शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पसंती आधारित श्रेयांक पद्धती (सी.बी.सी.एस.) प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत एक दिवसीय पसंती आधारित श्रेयांक पद्धती प्रशिक्षण कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ अकोला चे सचिव श्री गोपाल खंडेलवाल हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ दिनेश सूर्यवंशी, प्राचार्य जगदीश साबू, प्राचार्य प्राचार्य किरण खंडारे,इतर महाविद्यालयांचे उपस्थित होते. […]

Continue Reading

राज्यभरात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

अकोला :  जिल्ह्यात सुद्धा गेल्या चार दिवसांपासून कधी हलक्या तर कधी जोरदार पावसाची हजेरी लागत आहेय..त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना याचा फटका बसत आहेय..अकोला येथील ग्राम पाटी येथे गेल्या काही दिवसांपासून लगातार पाऊस सुरु आहेय,परिणामी पाटी शिवारातील अनेक शेताला तलावाचे स्वरूप आले आहेय..या शेतात कपाशी कमी व पाऊसच जास्त दिसुन येत आहे.शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने […]

Continue Reading

पेट्रोलचे दर १२ रुपयांनी कमी होण्याची शक्यता

मुंबई: गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल २५ ते ३० डॉलरनी स्वस्त झाले आहे. सध्या क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति-बॅरल दरावर ट्रेंड होत आहे. मात्र आपल्या देशात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये कुठलीही […]

Continue Reading

राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

नागपूर : गेल्या चार महिन्यांत घेतलेल्या सभा, ठाकरे सरकारवर ओढलेले आसूड, भाजपला अनुकूल घेतलेली भूमिका, ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा तसेच शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांचं बंड आणि मोठ्या नाट्यानंतर शिंदे-फडणवीसांचं विराजमान झालेलं सरकार, दरम्यान या काळात आजारपणावर केलेली मात, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी […]

Continue Reading