“चाळीस गद्दारांनी सरकार पाडल्याने प्रकल्प…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गरबा…”

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुजरातमध्ये आपला प्रकल्प उभा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या […]

Continue Reading

“बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर नवा आरोप

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आलं होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. “महाराष्ट्राची शरमेनं मान खाली घालण्याचा प्रकार सूरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा […]

Continue Reading

ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच अशी बैठक घेऊन कंपनीला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र […]

Continue Reading

हिंदुत्व महाराष्ट्रात उद्योग गुजरात मध्ये

प्रा. प्रशांत पळसपगारउप संपादक सिटी न्यूज सुपरफास्ट राजकारण हे जनहितार्थ आणि व्यक्तीकेंद्रीत असायला पाहिजे परंतु गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे गढूळ झाल्याचे दिसत आहे, वर्चस्वाच्या लढाईमध्ये आणि सत्ता स्थापन करण्याच्या धुंदीमध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची राजकीय सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. महाराष्ट्राकडे पाहण्याचा आज दृष्टीकोण संपूर्ण जगात बदलत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे महानाट्य गेल्या काही महिन्यापासून […]

Continue Reading

विकासकाकडून शेतकऱ्याची तीन कोटींची फसवणूक; हिंजवडीत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : जमीन व्यवहारातील ठरलेली तीन कोटी १० लाख रूपयांची रक्कम न देता विकसकाने फसवणूक केल्याची तक्रार नेरे येथील शेतकऱ्याने हिंजवडी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम दत्तात्रय कुदळे (वय-६१, व्यवसाय-शेती, रा. गणेशनगर, नेरे) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्सचे मालक के. आर. मलिक, मोहम्मह बीन […]

Continue Reading

…त्यापेक्षा राज्य सरकारने सत्ता पंधरवडा नाव द्यावे – सचिन सावंतांनी केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ साजरा केला जाणार आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा पंधरवाड्याबाबत माहिती दिली आहे. तर, भाजपाच्या […]

Continue Reading

वरळीत ९५ हजार रुपये प्रति चौरस फूट अशा विक्रमी दराने घराची विक्री; १५१ कोटीत दोन सदनिकांची खरेदी

मुंबई : मुंबईतील जागेला सोन्याहुन अधिक भाव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वरळीतील दोन सदनिकांची विक्री तब्बल ९५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने झाली आहे. एकूण १६०७२ चौ फुटच्या या दोन घरांची किंमत १५१ कोटी झाली. वरळीत अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प ३६० (थ्री सिक्स्टी) नावाची इमारत असून यात आलिशान अशी घरे आहेत. अभिनेता शाहिद […]

Continue Reading

“नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नाही आणि मंत्रालयात…”, अजित पवारांचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अद्यापही आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारलेला नाही या मुद्द्यावरून जोरदार टीकास्त्र डागलं आहे. “नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारलेला नाही आणि मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत, असा टोला लगावला. ते आज […]

Continue Reading

“नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नाही आणि मंत्रालयात…”, अजित पवारांचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अद्यापही आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारलेला नाही या मुद्द्यावरून जोरदार टीकास्त्र डागलं आहे. “नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारलेला नाही आणि मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत, असा टोला लगावला. ते आज […]

Continue Reading

शरद पवार सोडल्यास राष्ट्रवादी…; भाजपा, PM मोदींवर केलेल्या टीकेवरुन बावनकुळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. रविवारी तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रवादीच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर करण्यात आलेल्या टीकेवरुन बावनकुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख ‘टोळी’ असा केला आहे. मात्र त्याचवेळी बावनकुळे यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला आहे.धुळ्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना बावनकुळे […]

Continue Reading