– दिनोडा ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
अकोट : दिनोडा, कुटासा सर्कलमध्ये येणाऱ्या वरुड जउळका दिनोड़ा मरोडा येथे तीन-चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अकोट तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली. खारपाणपट्ट्यात सुरुवातीला मूग, उडीद पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सद्य:स्थितीत मुख्य पीक कपाशी असून, परिसरात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे जमिनीत पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर जमिनीला तलावाचे स्वरूप दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कपाशी पिके करपत असून, पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, यासाठी दिनोडा येथील माजी सरपंच लोणकरन डागा, पोलीस पाटील विलासराव मुरकुटे, पुरुषोत्तम गीते, उपसरपंच सागर थोरात, मनीष सानप, भाजप सरचिटणीस विठ्ठल वाकोडे, पत्रकार गणपत सांगळे यांची उपस्थिती होती