कोठारी येथील बचत गटातील महिलांना कृषिकन्या यांचे मार्गदर्शक

अकोला

मूर्तीजापुर  :  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील विद्यार्थिनी  कुमारी साक्षी वाघ व निकिता येवले यांनी ग्रामीण कृषी व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कोठारी येथील शिवशक्ती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांना भेट देऊन बचत गटाचे कामकाज आणि कार्यप्रणाली बद्दल माहिती जाणून घेतली बचत गटातील महिलांशी संवाद साधला व बचत गटातील सदस्यांना बचत गटांना उपलब्ध नवीन शासकीय योजना महिला स-शक्तिकरण बद्दल मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित महिला सदस्यांनी शासनाद्वारे गटाला मिळणाऱ्या लघु कर्ज सामूहिक कर्ज बद्दल माहिती दिल्ली. या कार्यक्रमाला बचत गटाचे अध्यक्ष संगीता टप्पे व सचिव सुनीता टप्पे यांचे सहकार्य लाभले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. खर्डे , कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. टी.कवर कार्यक्रम अधिकारी प्रा.पि. ए. देशमुख व विषय तज्ञ के.एम.वानखडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *