राज्यात आता दोन नवे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव

ताज्या घड्यामोडी

मुंबई,
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार हे अल्पमतात असूनही राज्यातील काही शहरांच्या नामांतराचा घाईगडबडीत निर्णय घेण्यात आला होता. या निणNयांबाबत पुढे काही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न निर्माण झाल्याने आम्ही नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’, असे नाव देण्याचा निणNयही घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पुढील अधिवेशनात नामांतराबाबतचे हे ठराव मांडून त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येईल. त्यानंतर हे ठराव केंद्राकडे पाठवले जातील. केंद्राकडून लवकरात लवकर मंजूरी मिळावी, म्हणून राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करणार आहे.

प्रशासनाला रस्ते, वाहतूकीच्या प्रकल्पासाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबात एकनाथ शिंदे यांनी सांगितले, एमएमआरडीएतर्फे शिवडी न्हावा शेवा प्रकल्पासारखे अनेक प्रकल्प मुंबई परिसरात सुरु आहे. त्यामुळे मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. हे प्रक्लप रखडू नये म्हणून एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींची शासनहमी सरकार घेणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने सुरु केलेली अनेक कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मध्ये कोविड व इतर कारणामुळे हे प्रकल्प रखडले, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदे यांनी मविआ सरकारला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *